अजित कुमारची दिशाभूल करून दिव्या त्याच्या विरोधात असलेले सर्व पुरावे गोळा करते. मात्र या तपासात दिव्याच्या बाबतीत डॉक्टरला संशय आला असल्याने तोही सतर्क आहे. अशातच दिव्या डॉक्टरच्या तावडीत सापडणार की आणखी काही वेगळे घडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. मालिकेत नुकतेच डिंपल आणि डॉ अजितच्या लग्नाचे चित्रीकरण पार पडले आहे. या सोहळ्याचे फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. लग्न सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून लग्नात डिंपलने लाल रंगाचा शालू आणि डॉ अजितने शेरवानी परिधान केलेला पाहायला मिळत आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Devmanus #Devisingh #Acpdivya #Nehakhan #Kirangaikwad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber